भारत आणि इंग्लंड दरम्यान होत असलेली टी ट्वेन्टी मालिका ‘सी-सॉ’ प्रमाणे सुरू आहे. पहिला सामना इंग्लंडने जिंकला तर दुसऱ्या सामन्यात भारताने विजयश्री खेचून आणली, तिसऱ्या सामन्यात पुन्हा इंग्लंडने यशाचा सूर्य मावळू दिला नाही.आज मालिकेतील चौथा सामना आहे.

कसोटी मालिकेत इंग्लंडला हरवल्यावर अहमदाबाद येथील भव्यदिव्य स्टेडियममध्ये वीस वीस षटकांची मालिका सुरू झाली आहे. इंग्लंडचा संघ टीट्वेन्टी क्रिकेटमध्ये कायमच अव्वल दर्जाचा समजला जातो. त्याची स्पष्ट झलक दोन सामन्यात दिसून आली आहेच.आजच्या सामन्यात कॅप्टन विराट कोहलीने योग्य टीम निवड करणं गरजेचं आहे.

तिन्ही सामन्यात अपयशी ठरलेल्या केएल राहुल ऐवजी योग्य पर्याय विराट कोहलीने निवडायला हवा. आयपीएलमधून लोकप्रिय झालेल्या सुर्यकुमार यादवला दुसऱ्या सामन्यात आंतरराष्ट्रीय टीट्वेन्टी क्रिकेटमध्ये पदर्पणाची संधी मिळाली पण त्याला बॅटिंगची संधी मिळाली नाही. तिसऱ्या सामन्यात त्याला पुन्हा संघाबाहेर ठेवलं गेलं.

आज त्याला संघात जागा मिळेल का याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष आहे. डावखुरा आक्रमक बॅट्समन ईशान किशनने दुसऱ्या सामन्यात झंझावाती अर्धशतक ठोकले होते. त्याच्याकडून आजच्याशी सामन्यात तशाच खेळीची अपेक्षा आहे. स्वतः कॅप्टन विराट कोहली फॉर्ममध्ये परत आला आहे. सलग दोन सामन्यात अर्धशतके त्याने केली आहेत. आजचा सामना भारतीय टीमसमोर करो वा मरो आहे. आज भारतीय टीम गुड न्यूज देईल ही अपेक्षा करूया.

लेखक- अभिजीत पानसे

(गुड न्यूज वेब पोर्टल हे एक सकारात्मक बातम्या, लेख, अपडेट्स देणारं आगळंवेगळं पोर्टल आहे. आमचे विविध विषयांवरील लेख, बातम्या वाचायला गुड न्यूजशी संलग्न व्हा. आपला फीडबॅक आम्हाला कळवा.)

Subscribe to our Telegram Channel