The guy who made “Balu Lokhande” viral is back.
Sunandan Lele is a cricketer first and a journalist later. He is known for his knowledge of the sport but moreover his ‘Puneri’ wit with which he’ll answer your questions. His blood group, as he mentions in his twitter bio, is C-positive (Cricket positive). Currently he works as a freelance sports journalist in Pune and hosts a talk show with Harsha Bhogle and Vikram Sathye, two other experts in the field.
तर लेले असं म्हणतात की…
- भविष्याचा विचार केला तर श्रेयस अय्यर भारताचा कर्णधार म्हणून कितपत योग्य उमेदवार
आहे ? माझं तर एक चाहता म्हणून वयक्तिक स्वप्न आहे श्रेयस ला कर्णधार आणि राहुल द्रविड
का कोच म्हणून सोबत बघायचं. यावर लेले काय म्हणतात ?
- श्रेयसअय्यर भारताचा कर्णधार हा जरा जास्तच पुढचा विचार वाटतोय मला. हे नक्की की तो
चांगला खेळाडू आहे आणि त्याच्यात नेतृत्वगुण पण आहेत. तरीही सांगतो की श्रेयस कप्तान
आणि राहुल द्रविड कोच हे स्वप्न सत्यात नाही उतरणार कारण राहुल द्रविड इतके दिवस
घराबाहेर नाही राहू शकत हे नक्की आहे. भारतीय संघाच्या कोचला किमान 7 महिने टूरींग करावे
लागते हे लक्षात घेऊन मी सांगतोय.
- टी-२०विश्वकप साठी भारतचा बॉलिंग कॉम्बिनेशन काय असावा ?
- बुमराआणि भुवी नवा चेंडू टाकतील आणि जडेजा सोबत वरुण चक्रवर्ती नक्की असतील. ह्याला
जोड एका वेगवान गोलंदाजाची आणि एका अष्टपैलू खेळाडूची लागेल. मला समजल्याप्रमाणे
हार्दिक थोडी गोलंदाजी करेल. म्हणजेच शार्दूल ठाकूर खेळायची शक्यता वाढते.
- विराटकोहली नंतर टी-२० मध्ये कर्णधार कोण असू शकतो ?
- विराटनंतर एकाचाच हक्कं आहे टी20 कप्तान बनायचा आणि तो आहे हिटमॅन रोहित शर्मा. खरं
बोलायचं तर रोहितला ही संधी अगोदरच मिळायला हवी होती. पण देर आए दुरुस्त आए असंच
म्हणेन मी.
- ऋतुराज गायकवाड हा भविष्यात टेस्ट ओपनर होऊ शकेल का ? तुम्हाला काय वाटतं ?
- ऋतुराजचेभविष्य उज्ज्वल आहे यात शंकाच नाही. लवकरच भारतीय संघाचे दरवाजे
त्याच्याकरता उघडतील.
- सेमी- फायनल साठी कुठल्या टीम क्वालिफाय होतील, काही अंदाज ?
- टी20क्रिकेट प्रकार असा आहे की 12 पैकी 8 संघ तगडे असतात. सामन्याच्या दिवशी कोणाला
चांगली लय सापडते त्यावर सगळे अवलंबून असते. त्यामुळे 4 संघ कोण येतील याचा अंदाज
वर्तवणे कठीण आहे. तरीही मला भारत + वेस्ट इंडीज + इंग्लंड + ऑस्ट्रेलिया संघ आले तर
आवडतील.
- टी-२०विश्वकप साठी भारताच्या टीम मध्ये अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती सारखे फ़िरकी
बॉलर असले तरीही युझवेन्द्र चहल नाहीये. आणि चहल चा अनुभव कामी येऊ शकतो का,
तुम्हाला काय वाटतं ?
- दुर्दैवानेयुझवेंद्रने आयसीसी स्पर्धात बरीच संधी मिळून खूप चमक दाखवली नाही. त्यामुळे वरुण
चक्रवर्तीवर आपण लक्ष ठेऊयात.
- Is Rishab Pant the next “Dhoni’’?
- रिषभपंत चांगला खेळाडू आहे पण लगेच त्याला उद्याचा धोनी नको ठरवायला. पहिला सिनेमा
करणार्या नटाला आपण उद्याचा अमिताभ म्हणू का? नाही ना तसेच आहे हे. धोनीने खूपच
वेगळी उंची गाठून दाखवली आहे. ती मिळवायला रिषभला प्रचंड एकाग्रता सातत्य राखायचे
आव्हान पेलावे लागेल.
- टी-२०विश्वकप मध्ये नवीन टीम पैकी कोणती टीम लंबी रेस का घोडा ठरू शकते ?
- मलाहीआवडले असते की नवीन संघ पुढे आला तर. पण सत्य बोलायचे तर नव्या संघात ती
ताकद दिसत नाही. एखाद्या सामन्यात ते मोठ्या संघाला धक्का देतीलही पण सातत्याने तसे
करणे कोणत्या नवख्या संघाला जमेल असे वाटत नाही. तरीही मला आयर्लंडचा संघ दमदार
वाटतो.
- उमरान मलिक (हैद्राबाद संघ) लवकरच आंतरराष्ट्रीय संघात पहायला मिळेल असा वाटतं का ?
- उमरानमलिक खूपच आकर्षक वेगवान गोलंदाज आहे. जो गोलंदाज 140च्या वर सतत मारा करू
शकतो त्यात गुणवत्ता आहे हे सांगायला ज्योतिषाची किंवा माझ्या सारख्या पत्रकाराची गरज नाही.
त्याला बीसीसीआयने आता मुख्य प्रवाहात सामावून घेतले आहे ही खूप सकारात्मक गोष्ट झाली
आहे. भारतीय संघासोबत राहून तो सरावातील आणि व्यायामातील शिस्त आपोआप शिकेल आणि
अजून सुधारेल.