– लॉकडाऊनच्या काळात प्रत्येकाचाच वेध बदलत असताना, चिंचवड मध्ये रहाणाऱ्या धनंजय घेवारे या सिव्हिल इंजिनिअरने कॅन्सर बाबतीत अभ्यास करताना चहा पिण्याच्या प्लास्टिक कप बद्दल महिती वाचली. तेव्हा त्याच्या लक्षात आले की या कपांमध्ये चहा प्यायल्याने भयानक अशा कॅन्सर रोगाचे प्रमाण अधिक वाढते. देशात आज दररोज २६,००० टन प्लास्टिकच्या कचरा तयार होत असतो.
त्यावर उपाय शोधत असताना परदेशात वापरल्या जाणाऱ्या बिस्कीटांच्या कपांबद्दल त्याला कळले.
लॉकडाऊन काळात चीन वरुंत छोटेखानी मशीनवर प्रयत्न करून योग्य प्रमाणातील मिश्रणापासून कप तयार केले.
त्याने मग हळू हळू ही संकल्पना पुण्यासोबतच कर्नाटक, केरळ, हैदराबाद, गुजरात, मुंबई येथील दुकानांमध्ये त्याचे वितरण केले. जून २०२० मध्ये प्रायोगिक तत्त्वावर तर ऑक्टोबर २०२१ पासून त्याला व्यावसायिक रीत्या लोकांपर्यंत पोहचवले.
त्याच्या सोबत रोहिणी कुलकर्णी,आणि मृदुला पंडित हे काम सांभाळतात.
त्याने सगळ्यांनाच या कपांचा वापर करण्याचे आवाहन केले असून सोबतच कॅन्सर रोगाला टाळण्यासाठी या उपक्रमाला साथ द्यावी अशी इच्छा व्यक्त केली.
व
कपचे फायदे :
– पर्यावरण पूरक असल्याने इको फ्रेंडली.
– चहा बिस्कीट असा टेस्टी नाष्टा.
– लॅब टेस्टेड हेल्दी प्रोडक्ट.
– लहान मुलांसाठी आकर्षक.
– ‘ से नो टू प्लास्टिक ‘ या संकल्पनेला साथ देणारं प्रोडक्ट.
आधी आपण चहा मध्ये बिस्कीट तर खाल्लेच आहे, चला आता बिस्किटात चहा प्येऊया.